loader
Breaking News
Breaking News
Foto

दुचाकीस्वाराला वाचविताना कार महामार्ग लगतच्या खड्ड्यात कलंडली, दुशाकी चालक जखमी

लांजा (संजय साळवी) - दुचाकीस्वाराला वाचविताना कार महामार्ग लगतच्या खड्ड्यात कलंडली. यामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात शनिवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावरील देवधे नाका येथे घडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हनमंत पालेकर (४३ वर्षे, रा. सुकापूर नवीन पनवेल, जि. रायगड) हे आपल्या ताब्यातील होंडा सिटी चारचाकी कारने (क्र. एमएच ०६ सीडी १८१०) पनवेल ते तारकर्ली मालवणला जात होते. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी व मुलगा होता. त्यांची कार देवधे नाका येथे आली असता प्रमोद प्रभाकर भुते (५२ वर्षे, रा. मांडवी बंदररोड, रत्नागिरी, ता. जि.रत्नागिरी) व पत्नी पूजा प्रमोद भुते (४९ वर्षे) हे आपल्या ताब्यातील (क्र. एमएच.०८.बीबी.९५४१) होंडा कंपनीची ऍक्टिव्हा दुचाकीने देवधे - पुनस रोडला आत जाण्यासाठी देवधे नाका येथे हायवे क्रॉस करत होते.

टाइम्स स्पेशल

महामार्गावर कारच्या समोर अचानक दुचाकी आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात कार महामार्गालगतच्या खड्ड्यात जाऊन कलंडली. यामध्ये कालचालक यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. तर दुचाकीस्वार प्रमोद भुते यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg