loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. सदस्य प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी; ५३ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य, मनसेचे गुहागर चिपळूण तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त तळवली कॉलेज व हायस्कूल मधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. तसेच ५३ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली, विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबीर पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तळवलीचे प्राचार्य थरकार, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, उपतालुकाध्यक्ष स्वप्निल जाधव, उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर, मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी, वडद शाखाध्यक्ष प्राणेश पिंपळकर, सुनील मूकनाक, महाराष्ट्र सैनिक सोहम गांधी, सांस्कृतिक विभाग राहुल जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप आग्रे, महाराष्ट्र सैनिक विराज गांधी, सागर शिरगावकर आदी महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवलीचे प्राचार्य थरकार यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व आयोजकांचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांनीही प्रमोद गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. या शिव्यासाठी चिपळूण येथील एस. एम. एस. हॉस्पिटल येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी मेहनत घेतली. शिबिरामध्ये जनरल आरोग्य तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, भगंदर, स्टोन, यांसारख्या ऑपरेशन संदर्भात तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन. केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg