loader
Breaking News
Breaking News
Foto

निसर्ग संवर्धन संस्थेच्या सर्पमित्रांनी आपल्या समस्यांबाबत घेतली लांजा तहसिलदार प्रियांका ढोल यांची भेट

लांजा (संजय साळवी) - सर्पमित्र अशी ओळख असलेल्या तालुक्यातील निसर्ग संवर्धन संस्थेने लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांची मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी भेट घेतली. सर्पमित्रांसाठी येणार्‍या अडचणी, समस्यांबाबत चर्चा केली शासनाकडून सुविधा मिळणार्‍या सुविधा याविषयी चर्चा केली. साप दिसताक्षणी विचार न करता सापाला लाठ्या-काठ्यांनी मारणारा समाज अनेक वेळा दृष्टीस पडतो आहे. मात्र निसर्गातील सर्प या प्राण्याला वाचविण्यासाठी सर्पमित्र वगळता कुणीही पुढाकार घेत नाही. वन विभागही त्यादृष्टीने सतर्कता दाखवित नाही. मात्र याला अपवाद लांजा तालुक्यातील निसर्ग संवर्धन संस्था ठरत आहे. सर्प बचावासाठी जीव धोक्यात घालून संस्थेचे सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. एकूण वीस सर्पमित्र या माध्यमातून सर्प बचाव आणि रक्षण यासह सापापासून मानवी रक्षण करण्यासाठी दिवसा, रात्री-अपरात्री धावपळ करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र या सर्प मित्रांना शासनाकडून कोणत्याच सोयीसुविधा मिळत नसल्याने लांजातील निसर्ग संवर्धन संस्थेच्या सदस्यांनी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. साप दिसताच नागरिक सर्पमित्रांना संपर्क साधत असतात, मात्र सर्पमित्र क्षणाचाही विलंब न लावता जीव धोक्यात घालून सापांना पकडून सुरक्षित त्यांच्या अधिवासात सोडून देत असतात. अशावेळी वन विभागाकडून सर्पमित्रांना कोणतीच सहानुभूती मिळत नाही. वन विभागाकडून सहकार्य न करता सर्पमित्रांना त्रासदायक ठरेल अशीच वागणूक दिली जाते. त्यामुळे सर्प मित्रांकडून संताप व्यक्त केला. त्यामुळे वन विभाग व तालुका प्रशासनाने सर्प मित्रांना योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी यावेळी निसर्ग संवर्धन संस्था लांजाच्या सदस्यांनी तहसीलदार प्रियांका ढोले यांच्याकडे केली.

टाईम्स स्पेशल

यावेळी तहीसलदार प्रियांका ढोले यांनी आपण करत असलेले काम खूप मोलाचे आहे. यातून आपण एकप्रकारे प्रशासनालाच सहकार्य करत आहात. त्यामुळे आपल्याला प्रशासनाकडून लागेल ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन तहसीलदार प्रियांका ढोले यांनी सर्पमित्रांना दिले. दरम्यान, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांच्याशी चर्चा करताना निसर्ग संवर्धनचे सचिन जाधव, संदेश जाधव, चेतना कांबळे, मंगेश पांचाळ, विशाल कांबळे, अजय मेहेर, प्रविण कांबळे, भारत पालवकर, मिथुन कांबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg