संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील दुदमवाडीतील ग्रामस्थांनी जलसंधारणाचे महत्त्व ओळखून तामनकोंड पऱ्ह्यावर नपापू विहिरीनजीक बंधारा बांधला आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
सध्या पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून त्याचा उपयोग व्हावा, यासाठी ग्रामीण भागात जलसंधारणाच्या कामांची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर दुदमवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत तामनकोंड पऱ्ह्यावर बंधारा बांधण्याचा उपक्रम राबविला. या बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडवून पाणी साठवण्यास मदत होणार असून, परिसरातील भूजल पातळी वाढण्यासही हातभार लागू शकतो. संगमेश्वर तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने भविष्यात पाणीटंचाईची चिंता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत लहान नाले, ओढे आणि पऱ्ह्यांवर बंधारे उभारून पाणी अडविणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी लोकसहभागातून केलेल्या या कामामुळे जलसंधारणाचा संदेशही परिसरात पोहोचत आहे.
या बंधाऱ्याच्या उभारणीत दत्ताराम सहदेव दुदम, अनंत दुदम, रमेश दुदम, नरेश दुदम, रामचंद्र दुदम, वर्षा दुदम, अंकिता दुदम यांच्यासह दुदमवाडीतील अन्य ग्रामस्थांनी सहभाग घेतला. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन ग्रामस्थांनी एकजुटीने केलेला हा उपक्रम इतर वाड्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. शासनाच्या विविध जलसंधारण उपक्रमांना ग्रामस्थांच्या लोकसहभागाची जोड मिळाल्यास पाणी साठवणुकीची कामे अधिक प्रभावीपणे राबविता येऊ शकतात. त्यामुळे अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.