loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडच्या तीन ज्वलंत प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे संयुक्त निवेदन!

मंडणगड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील जनतेच्या मूलभूत हक्कांशी संबंधित तीन अत्यंत महत्त्वाचे विषय घेऊन युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना संयुक्त निवेदन सादर करण्यात आले आहे. संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्यामार्फत व तहसीलदार मंडणगड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांसह २५ विभागांना पाठविण्यात आले आहे. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, हे विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधासाठी नसून जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक व्हावी आणि प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावी, या प्रामाणिक हेतूने मांडण्यात येत आहेत. विषय १ : तुळशी व चिंचाळी धरणातील पाणी - जनतेचा पिण्याच्या पाण्याचा हक्क धोक्यात मंडणगड तालुक्यातील तुळशी धरणातील पाण्याचा वापर, पाणी उपसा, पाणी वाटप आणि परवानग्यांबाबत स्थानिक नागरिकांकडून गंभीर तक्रारी व शंका व्यक्त करण्यात येत आहेत. धरणातील पाणी कोणत्या उद्देशासाठी राखीव आहे, किती पाणी उपलब्ध आहे, कोणाला किती पाणी वापरण्याची परवानगी दिली आहे, प्रत्यक्षात किती पाणी उपसा केला जात आहे आणि यावर कोणत्या विभागाचे नियंत्रण आहे, याची अधिकृत माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. धरणातील पाणी वापरताना सर्वप्रथम स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा हक्क सुरक्षित राहिला पाहिजे. त्यानंतर शेती, बागायतदार, पशुधन यांचे नियोजन करावे. पिण्याच्या पाण्यावर परिणाम होईल अशा कोणत्याही अनधिकृत पाणीउशाला परवानगी देता कामा नये, असे निवेदनात नमूद आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिंचाळी धरणाबाबत मत्स्यव्यवसायासाठी परवानगी देण्यात आल्याच्या आणि पाण्यात मत्स्यखाद्य किंवा खत टाकले जात असल्याच्या तक्रारी व्यक्त होत आहेत. या बाबींची प्रत्यक्ष पाहणी व वैज्ञानिक तपासणी करून सत्यता निश्चित करावी, अशी मागणी आहे. विशेषतः ज्या गावांनी कालवा किंवा पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी जमिनी दिल्या आहेत, त्या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या हक्काचे संरक्षण होणे आवश्यक आहे. पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये. स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याचे नियोजन, उपलब्ध साठा आणि वितरण याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या विषयातील प्रमुख मागण्या : दोन्ही धरणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत प्रत्यक्ष पाहणी व सखोल चौकशी करावी. पाणीसाठा, पाणीवाटप, पाणीउपसा आणि दिलेल्या सर्व परवानग्यांची अधिकृत माहिती सार्वजनिक करावी. परवानगीशिवाय किंवा मंजूर मर्यादेपेक्षा अधिक पाणीउसा होत असल्यास तात्काळ थांबवून कारवाई करावी. चिंचाळी धरणातील मत्स्यव्यवसाय परवानगी, करार, अटी तपासाव्यात. पाण्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासून अहवाल सार्वजनिक करावा. मार्च २०२७ च्या संभाव्य टंचाईसाठी कृती आराखडा तयार करावा.

विषय २ : महामानवांच्या नावाचा जीर्ण नामफलक - सन्मानाचा प्रश्न! मंडणगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे महामानवांच्या नावाचा नामफलक अत्यंत जीर्ण, फाटलेल्या व दुरवस्थेतील असल्याचे निवेदनात निदर्शनास आणून दिले आहे. सदर नामफलकाचे छायाचित्र पुरावा म्हणून निवेदनासोबत जोडण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला शिक्षण, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखविला. ज्या महामानवाने वंचित, शोषित, मागासवर्गीय समाजाला शिक्षणातून स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली, त्यांच्याच नावाने असलेल्या शासकीय वसतिगृहाचा नामफलक फाटलेल्या अवस्थेत असणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे, असे संघटनेने म्हटले आहे. हा केवळ नामफलकाचा प्रश्न नसून महामानवाच्या सन्मानाचा, सामाजिक अस्मितेचा आणि प्रशासकीय यंत्रणेच्या जबाबदारीचा विषय आहे. या विषयातील प्रमुख मागण्या : वसतिगृहाची व जीर्ण नामफलकाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. तात्काळ नवीन, आकर्षक, दर्जेदार, स्पष्ट अक्षरांचा नामफलक सन्मानपूर्वक बसवावा. नामफलकाची इतकी दुरवस्था होईपर्यंत लक्ष का गेले नाही, याची प्रशासकीय चौकशी करावी. रत्नागिरी जिल्ह्यातील महापुरुषांच्या नावाने असलेल्या सर्व शासकीय संस्थांच्या नामफलकांची विशेष तपासणी मोहीम राबवावी. भविष्यात दुरवस्था होऊ नये यासाठी नियमित देखभालीचे लेखी निर्देश द्यावेत. विषय ३ : आंबडवे - महामानवांच्या जन्मभूमीकडे जाणारा रस्ताच रखडला!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg