loader
Breaking News
Breaking News
Foto

उभाबाजार येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त दक्षिणाभिमुख मारुतीला १ हजार मोदकांचा महानैवेद्य

सावंतवाडी: उभा बाजार येथील प्रसिद्ध श्री दक्षिणाभिमुख मारुती मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हजार मोदकांचा (सहस्त्र मोदक) महानैवेद्य अर्पण करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यानिमित्त मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ​संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून श्री दक्षिणाभिमुख मारुतीची विशेष पूजा व महाअभिषेक करण्यात आला. यानंतर बाप्पाला आणि मारुतीरायाला प्रिय असणाऱ्या १ हजार मोदकांचा विशेष महानैवेद्य अर्पण करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आकर्षक पद्धतीने सजवलेली मोदकांची आरास भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.​दिवसभरात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी महाआरती करून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यामुळे संपूर्ण उभाबाजार परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मंदिर समितीच्या सदस्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg