राजापूर (तुषार पाचलकर): राजापूर तालुक्यातील पाचल-दिवाळवाडी येथील श्री राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्थानिक कलाकार श्वेता इस्कर हिने साकारलेल्या अत्यंत मनमोहक आणि जिवंत अशा राधा-कृष्णाच्या भव्य रांगोळीने भाविक तसेच रसिकांचे लक्ष वेधून घेतले. रंगांचा सुरेख मिलाफ आणि कलात्मक बारकाव्यांमुळे ही रांगोळी संपूर्ण परिसरात विशेष कौतुकाचा विषय ठरली आहे.
ग्रामीण भागात प्रतिभावान कलाकारांची वानवा नाही, मात्र त्यांना हक्काचे व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते, ही जाणीव ठेवून मंडळाने या उत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध करून दिली. केवळ धार्मिक विधी आणि उत्सवापुरते मर्यादित न राहता सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची जोड देत मंडळाने हा उपक्रम यशस्वी केला. श्वेता इस्कर हिने आपल्या कल्पकतेतून ही आकर्षक कलाकृती साकारली असून, या निर्मितीत तिला प्रतीक्षा ढवळे हिचे मोलाचे सहकार्य लाभले.
या अप्रतिम कलाकृतीची दखल घेत श्री राधाकृष्ण नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने श्वेता इस्कर आणि प्रतीक्षा ढवळे यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर गौरव करण्यात आला. मंडळाने केलेल्या या सन्मानामुळे ग्रामीण भागातील नवोदित कलावंतांचा आत्मविश्वास उंचावण्यास मोठी मदत झाली असून, भविष्यातही स्थानिक प्रतिभेला वाव देण्यासाठी अशाच प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणाऱ्या या उपक्रमाचे राजापूर तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.