खेड (दिलीप देवळेकर) - कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या तिसर्या टप्प्यासाठी सन १९७४ च्या सुमारास चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील घरे व शेतजमिनी संपादित करून खेड तालुक्यातील चाकाळे येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा प्रश्न तब्बल ५३ वर्षांनंतरही प्रलंबित असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुनर्वसनासाठी देण्यात आलेली जमीन डोंगराळ, नापीक आणि शेतीस अयोग्य असल्याचा दावा करत प्रकल्पग्रस्त दीपक मोहिते यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे अंतिम स्मरणपत्र सादर केले आहे. संबंधित २८ बाधित कुटुंबांना पर्यायी शेतजमीन अथवा त्याऐवजी संपूर्ण आर्थिक पॅकेज मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मोहिते यांनी निवेदनात नमूद केल्यानुसार, कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी मूळ गावे व शेतजमिनी संपादित झाल्यानंतर चाकाळे येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पुनर्वसनाच्या नावाखाली देण्यात आलेली जमीन प्रत्यक्ष शेती करण्यास अयोग्य असल्याने बाधित कुटुंबांना शेतीतून उपजीविका मिळविणे शक्य झालेले नाही. संबंधित भूमिअभिलेख विभाग आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या पाहणी अहवालांचाही या प्रकरणात महत्त्वाचा आधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जमिनीचे स्पष्ट सीमांकन, प्रत्यक्ष ताबा आणि वैध वाटप आदेश याबाबतही प्रश्न कायम असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या प्रश्नासंदर्भात १९ जानेवारी २०२६ पासून महसूल व वन विभाग, जलसंपदा विभाग, विभागीय प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित पुनर्वसन अधिकार्यांकडे वारंवार निवेदने देण्यात आली. राज्यपालांकडेही यापूर्वी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र, विविध कार्यालयांकडून पत्रव्यवहार आणि चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी संपूर्ण प्रकरणावर अद्याप कारणांसह अंतिम लेखी निर्णय मिळालेला नसल्याची खंत मोहिते यांनी व्यक्त केली आहे. निवेदनातून त्यांनी आठ प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये शासकीय पाहणी अहवालांनुसार जमीन शेतीयोग्य नसल्याचे निष्पन्न झाल्यास लागू पुनर्वसन धोरणानुसार पर्यायी जमीन किंवा संपूर्ण आर्थिक पॅकेज मंजूर करावे, रत्नागिरी जिल्ह्यात पर्यायी शेतजमीन उपलब्ध नसल्याबाबत अपर जिल्हाधिकार्यांच्या पत्रव्यवहाराची पडताळणी करावी, तसेच दीर्घकाळ शेतीयोग्य जमीन व उपजीविकेची साधने उपलब्ध न झाल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत आर्थिक नुकसानभरपाई आणि उदरनिर्वाह सहाय्य द्यावे, अशा मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय जमिनीच्या मूळ वाटप आदेशापासून ताबापत्र, नकाशा, सीमांकन, फेरफार नोंदी आणि सक्षम प्राधिकार्याच्या मंजुरीपर्यंत सर्व कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणित प्रती द्याव्यात, भूमिअभिलेख व कृषी विभागाच्या पाहणी अहवालांवर झालेल्या कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल मागवावा, तसेच चाकाळे येथे पुनर्वसित झालेल्या सर्व २८ कुटुंबांच्या मूळ संपादित जमिनीची आणि पुनर्वसन लाभांची स्वतंत्र पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रकरण इतकी वर्षे प्रलंबित राहण्यास जबाबदार असलेल्या प्रशासकीय त्रुटींची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन निश्चित कालमर्यादेत कारणयुक्त अंतिम लेखी निर्णय द्यावा, अशीही मागणी मोहिते यांनी केली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ आणि २१ मधील तरतुदींचा संदर्भ देत बाधित कुटुंबांच्या समानतेच्या आणि जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचा विचार करून शासनाने या प्रकरणात निष्पक्षपणे कार्यवाही करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. पाच दशकांहून अधिक काळ उलटूनही पुनर्वसनाचा मूलभूत प्रश्न सुटलेला नसल्याने आता केवळ चौकशी आणि पत्रव्यवहार नको, तर २८ बाधित कुटुंबांना न्याय देणारा कालबद्ध आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका दीपक मोहिते यांनी या अंतिम स्मरणपत्रातून मांडली आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.