loader
Breaking News
Breaking News
Foto

बर्वे ग्रंथालयात ३० नोव्हेंबरला तालुकास्तरीय वाचक स्पर्धा, कुमुद रेगे यांच्या साहित्यकृतीवर परीक्षण सादर करण्याची संधी

देवगड (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व उमाबाई बर्वे ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयानजीकच्या स्नेहसंवर्धक मंडळाच्या हॉलमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 'कुमुद रेगे यांची कोणतीही साहित्यकृती' या विषयावर स्पर्धकांना दहा मिनिटांत आपले परीक्षण सादर करायचे आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५०१, ३५१ व ३०१ रुपये रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना कुडाळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे वाचनप्रेमी आणि साहित्याची आवड असलेल्या इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी २८ नोव्हेंबरपर्यंत उमाबाई बर्वे ग्रंथालयात प्रत्यक्ष किंवा मोबाईल क्रमांक ९४२२६०२१६० वर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर व सचिव सीताराम पाटील यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg