loader
Breaking News
Breaking News
Foto

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, दापोली दिवाणी न्यायालयातील कर्मचारीही आंदोलनात सहभागी

दापोली (वार्ताहर) : समान काम, समान वेतन या मागणीसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज 17 नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या राज्यव्यापी आंदोलनात दापोली दिवाणी न्यायालयातील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच अन्य न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही समान वेतनश्रेणी लागू करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासंदर्भातील प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयात प्रलंबित असून, शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

न्यायदान प्रक्रियेत न्यायालयीन कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून, समान जबाबदारी पार पाडत असताना वेतनश्रेणीत भेदभाव का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रलंबित प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे पाऊल उचलले आहे. हा संप कोणाच्या विरोधात नसून न्याय्य हक्कांसाठी आहे. समान कामाला समान वेतन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg