loader
Breaking News
Breaking News
Foto

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली, जि.प. शाळा क्र. १ मध्ये 'स्वच्छता ही सेवा' व 'वाचन प्रेरणा दिन' संपन्न

दोडामार्ग (प्रतिनिधी) - भारताचे माजी राष्ट्रपती, 'मिसाईल मॅन' भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त (वाचन प्रेरणा दिन) १५ ऑक्टोबर २०२६ रोजी कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगरपंचायत कार्यालयात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत "स्वच्छता ही सेवा" अभियान आणि "वाचन प्रेरणा दिन" औचित साधून जिल्हा परिषद शाळा नंबर १ (दोडामार्ग) येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, स्वच्छता आणि वाचनाचे महत्व यावर मार्गदर्शक कार्यक्रम पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी कसई-दोडामार्ग नगरपंचायत कार्यालय येथे नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत आणि तरुण पिढीच्या घडणीत डॉ. कलाम यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण या वेळी करण्यात आले. "स्वच्छता ही सेवा" अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना आरोग्याचे धडे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणाव्यात, यासाठी जेवणापूर्वी व शौचक्रिया झाल्यानंतर हात योग्य पद्धतीने कसे धुवावे, याचे सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. स्वच्छतेमुळे अनेक आजारांपासून कसे दूर राहता येते, याबाबत उपस्थितांनी विद्यार्थ्यांना गाण्याच्या स्वरूपात शाळेतील शिक्षकान मार्फत मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमास यशवंत गवस (गटविकास अधिकारी, पंचायत समिती दोडामार्ग), संकेत गायकवाड (मुख्याधिकारी, कसई-दोडामार्ग नगरपंचायत), निवेद कांबळे, सुमित दळवी (पत्रकार) मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, नगरपंचायतीचे कर्मचारी,शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg