loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड समुद्रकिनाऱ्यावर स्काॅर्पिओ वाळूत फसली; बाहेर काढताना नाकीदम

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील ओल्या वाळूत स्काॅर्पिओ गाडीची सर्व चाकं खोलवर रुतून बसल्यामुळे गाडी मार्गस्थ होण्यासाठी अनेक युक्त्या लढवण्यात आल्या मात्र वाळूत रुतलेली स्काॅर्पिओ काही केल्या बाहेर काढण्यात यश येत नव्हते, त्यामुळे स्थानिक नागरिक, उपस्थित पर्यटक आणि यंत्रणांच्या मदतीने पुळणीत रुतलेली स्काॅर्पिओ बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोलीतील केळशी ते दाभोळ दरम्यानच्या विस्तीर्ण अशा समुद्र किनाऱ्यावर भटकंती करिता मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. यातील काही हौशी पर्यटक स्टंटबाजी किंवा फोटोशूटच्या नादात आपली वाहने थेट समुद्रकिनाऱ्यावरील मऊ वाळूत आणि पाण्याच्या जवळ घेऊन जातात. अशाच प्रकारे पुणे येथून भटकंती करिता दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर आलेले पर्यटक हे आपल्या ताब्यातील एम. एच. 12 एक्स. ई. 6444 स्काॅर्पिओ वाहन समुद्र किनाऱ्यावरुन बाहेर रस्त्यावर आणत असताना मात्र समुद्रकिनाऱ्यावरील त्यांच्या ताब्यातील स्काॅर्पिओ वाहनाची चाके थेट वाळूत खोलवर रुतली.

टाईम्स स्पेशल

दापोली तालुक्यातील केळशी ते दाभोळ पर्यंतच्या सर्वच समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी आपल्या ताब्यातील वाहन समुद्र किनाऱ्यावर कोणत्याही परिस्थितीत नेऊ नयेत, अशा प्रकारचे नामफलक लावलेले असताना देखील किनाऱ्यावर भटकंती करिता आलेल्या पर्यटकांच्या अतिउत्साहीपणा नडतो ते मुद्दामहून आपल्या ताब्यातील वाहन समुद्र किनाऱ्यावर नेतात आणि ज्यांना समुद्राच्या पुळणीचा अंदाज नसल्याने अशांची वाहने समुद्र किनाऱ्यावर फसतात. तसे दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर झाले. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी खासगी वाहने वाळूत नेण्यास येथे मनाई असतानाही येथे आलेले अतिउत्साही काही पर्यटक वाहने समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेले आणि त्यांच्या ताब्यातील स्काॅर्पिओ पुळणीत फसलं. पुळणीत फसलेले वाहन काही केल्या निघत नव्हते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg