loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी संजय आंब्रे यांची निवड

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी गुणदे गावचे माजी सरपंच संजय दत्ताजीराव आंब्रे यांची निवड करण्यात आली आहे. खेड तालुका सेवा संघाची खेड येथे नुकतीच बैठक झाली, त्यावेळी ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शरद शिर्के, विश्वास शिंदे, विनय कदम, यशवंत कदम, सखाराम कदम (भावोजी), विष्णुपंत आंब्रे, विचारे, दीपक आंब्रे, संदीप आंब्रे, चंद्रकांत आंब्रे, अ‍ॅड. आनंद भोसले, सतीश चिकणे, गुजर, पप्पी आंब्रे, अ‍ॅड. राजेश जाधव, राहुल सावंत, प्रभाकर पालांडे, विलास कदम आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल संजय आंब्रे यांचे खेड तालुका तसेच सातगाव आंब्रे आणि आवाशी-गुणदे पंचक्रोशीतून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg