loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड-धामणी घेरापालगड श्री झोलाई देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ

खेड - नवसाला पावणारी, श्रद्धास्थान आणि भाविकांचे ग्रामदैवत असलेल्या खेड-धामणी घेरापालगड येथील श्री झोलाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली असून, मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी सर्व भक्तगणांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची मनोभावे पूजा-अर्चा करून पारंपरिक पद्धतीने खणा-नारळाने ओटी भरली आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि पिकांवर निर्माण झालेल्या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर बळीराजावरील संकटांचे सावट दूर होऊ दे, शेतीला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांच्या कष्टाला यश मिळू दे आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना श्री झोलाई देवी मातेच्या चरणी करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुढील नऊ दिवस धामणी-घेरापालगड येथील सर्व वाडीतील देवी दर्शनाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम असलेल्या या नवरात्रोत्सवाला मुंबईकर, पुणेकर चाकरमानी आवर्जून आईच्या दर्शनाला येत असतात. त्यांच्या जीवनात या देवीचे विशेष श्रद्धास्थान आहे. या पवित्र पर्वाच्या निमित्ताने देवीच्या आशीर्वादाने सर्वांना सुख-समृद्धी लाभो, बळीराजा संकटमुक्त होवो आणि संपूर्ण कोकणात आनंद, समाधान व भरभराट नांदो, अशीच प्रार्थना भाविकांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg