loader
Breaking News
Breaking News
Foto

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे, वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे-आंबतखोल विद्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - जिल्हा परिषद रत्नागिरी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रशिक्षण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विद्यालयाचे प्राचार्य उदयराज कळंबे यांच्या प्रेरणेतून, सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या, वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून युगंधरा म्हामुणकर यांनी मार्गदर्शन केले. आपत्तीचे प्रकार, अचानक येणारे संकटे, त्यावर करावयाचे उपाय, या सर्वांमध्ये महत्त्वाचीं असणारी आपली मानसिकता याबाबत विविध उदाहरण व दाखले देऊन मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साध्या साध्या गोष्टींमधून आपण अनेक आपत्तीवर कशी सहज मात करू शकतो, याबाबत त्यांनी विविध प्रात्यक्षिकांमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपत्तीचे प्रकार स्पष्ट करत असताना मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती याबरोबरच सध्याच्या काळातील सूक्ष्म जिवाणू प्रसार आपत्ती (कोरोना) यासारख्या महामारी आपत्तींवर आपण सावध राहून, मन स्थिर ठेवून, खंबीरपणे सामोरे गेल्यास सहज मात करू शकतो. आयोजीत आपत्ती प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. म्हामुणकर या विषयावर सखोल स्पष्टिकरण देतांना पुढे म्हणाल्या की, विद्यार्थी जीवनामध्ये अचानक येणारी संकटे याबाबतही मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असणाऱ्या विविध साहित्याचा वापर संकटातून बाहेर येण्यासाठी शांत डोक्याने केल्यास सध्याच्या काळात विद्यार्थी स्वतःचे चांगले संरक्षण करू शकतो. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या संरक्षणाबरोबरच इतरांचेही संरक्षक बनावे असे आवाहन युगंधरा म्हामुणकर यांनी विद्यार्थ्यांना केले.

टाईम्स स्पेशल

नैसर्गिक आपत्ती यामध्ये पूर, दुष्काळ यांचा सामना करण्यासाठी, आपण आपत्ती येण्याअगोदरच त्याचे नियोजन केल्यास त्यावर आपण चांगल्या प्रकारे मात करू शकतो. मानवनिर्मित आपत्तीमध्ये वणवा, दंगल यासारख्या संकटाच्या वेळी आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने यावर योग्य तो मार्ग काढणे हितावह असते. घाबरून गेल्यास आपण अधिक संकटात सापडू शकतो आणि आपलेच नुकसान होऊ शकते. आपत्ती या येणारच आहेत आणि त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे याची जाणीव आजच्या प्रशिक्षिका म्हामुणकर यांनी आपल्या प्रशिक्षणातून करून दिली. यावेळी नांदगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख संचिता सावर्डेकर उपस्थित होत्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य कळंबे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक निलेश चव्हाण यांनी केले आणि आभार उदयकुमार पाटील यांनी मांडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg