loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मालवण (प्रतिनिधी) - ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवण या संस्थेचा २४ वा वर्धापन दिन लिलांजली सभागृह, मालवण येथे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर, मधू कांबीकर, तसेच दिवंगत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघाचे उपसचिव गवई आणि ज्येष्ठ सभासद डॉ. सुभाष दिघे यांनी गेल्या २३ वर्षातील संघाच्या वाटचालीचे विवेचन केले. त्यानंतर ज्येष्ठ लेखक, मुक्त पत्रकार, सभासद दिलीप रेडकर यांनी ज्येष्ठ नागरिक चळवळ या विषयावर ज्येष्ठ नागरिकांची मागणी, त्यांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांचे काही प्रलंबित प्रश्न, जागतिक ज्येष्ठ नागरिक संघाविषयी विस्तृतपणे माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सारस्वत बँकेचे अधिकारी प्रसन्न तेंडोलकर यांनी सायबर फसवणूक बद्दल ज्येष्ठ नागरिकांनी कसे सावध रहावे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बँकेचे दुसरे अधिकारी सचिन कामत यांनी बँकेच्या विविध बचत ठेवी योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर मारुती सोनवडेकर, अध्यक्ष रमाकांत वाक्कर, डॉ. सुभाष दिघे व इतर सभासदांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. यावेळी धान फॉउंडेशन संस्थेतर्फे दीप पाटील, अमित कदम यांनी आर्थिक नियोजन, डिजिटल सेवा, ग्राहक शिक्षण, ऑनलाईन फ्रॉड पासून संरक्षण कसे करायचे या विषयी माहिती दिली. प्रविणा शिंदे यांनी एटीएम कार्ड च्या दुरुपयोगाविषयी कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, सचिव रवींद्र धुरी, खजिनदार मंगेश शेर्लेकर, कार्यकारिणी सदस्य तसेच बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg