loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड : हॉटेलमध्ये काम करताना जिन्यावरून पडून वलोते येथील कामगाराचा मृत्यू

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड येथील एका हॉटेलमध्ये काम करत असताना जिन्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयत कामगाराचे नाव राजेश बबन तांबे (वय ४५, रा. वलोते, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश तांबे हे मंडणगड येथील हॉटेलमध्ये काम करत होते. कामावर असताना जिना उतरताना तोल जाऊन ते खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. राजेश तांबे यांच्या निधनाने वलोते गावावर शोककळा पसरली आहे

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg