loader
Breaking News
Breaking News
Foto

भोस्ते घाटातील दुर्गंधीचा प्रश्न गंभीर; उघड्यावर कोंबडीचे अवशेष टाकणे तात्काळ बंद करावे, RPI चा तीव्र आंदोलनाचा इशारा!

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोस्ते घाट परिसरात पसरत असलेली दुर्गंधी हा गंभीर सार्वजनिक आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न बनत चालला आहे. चिकन विक्रेत्यांकडून कोंबड्यांची आतडी, पाय, डोकी, पिसे व इतर टाकाऊ अवशेष भोस्ते घाट परिसरात टाकले जात असल्यामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना, वाहनचालकांना तसेच परिसरातील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भोस्ते घाट हा कोकणातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, पर्यटक आणि वाहनचालक प्रवास करतात. मात्र, चिकन विक्रेत्यांच्या निष्काळजीपणामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. कोंबड्यांचे अवशेष उघड्यावर टाकल्यामुळे माशांचा व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच परिसरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. या गंभीर समस्येकडे खेड तालुक्यातील प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रदूषण नियंत्रण यंत्रणेने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमच्या प्रशासनाकडे ठाम मागण्या आहेत : भोस्ते घाट परिसरात कोंबड्यांचे अवशेष टाकणार्‍यांची तातडीने चौकशी करावी. चिकन विक्रेत्यांनी कोंबड्यांची आतडी, पाय, डोकी, पिसे व इतर अवशेष रस्त्यावर अथवा उघड्यावर टाकू नयेत, यासाठी कठोर नियम लागू करावेत. कोंबड्यांच्या अवशेषांची शास्त्रोक्त आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी. भोस्ते घाट परिसराची तातडीने स्वच्छता करून दुर्गंधी दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. नियमांचे उल्लंघन करणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने नियमित देखरेख ठेवावी.

टाईम्स स्पेशल

भोस्ते घाटातील दुर्गंधीचा प्रश्न हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी निगडित आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. चिकन विक्रेत्यांनी कोंबड्यांचे अवशेष उघड्यावर टाकणे तात्काळ बंद करावे. प्रशासन आणि आरोग्य विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आणि भोस्ते घाट परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने छेडावे लागेल, असा इशारा सुरेंद्र दादा बोरजकर, पर्यावरण जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg