loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा पोलिसांनी गुरांची अवैध वाहतूक करणारी गाडी पकडली

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे पोलिसांची पेट्रोलिंग करीत असताना गुरांची अवैध वाहतूक करणारी गाडी साखरपा पोलिसांनी पकडली. मिळालेल्या माहिती नुसार संतोष गणपती सावंत वय ३९रा. येळाने तालुका शाहूवाडी हा आपल्या ताब्यातील एम एच ०७ पी ३६१६ पिकअप गाडीतून पंचवीस हजार रुपये किंमतीची गुरे वाहतूक करणारी गाडी मुंडे तर्फे सावर्डे ते येळाने तालुका शाहूवाडी येथे नेत असताना कोंडगाव तिठा येथे आली असता महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर व पोलीस कॉन्स्टेबल सुजित पाटील हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्या निदर्शनास आली. मनस्वी पावसकर यांनी गाडीसहीत गु्रे ताब्यात घेऊन साखरपा पोलीस दूर क्षेत्रात आणून गुन्हा दाखल करण्यात आला. याकामी पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव अधिक तपास करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg