loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यात 718.53 क्षेत्रातील 3035 शेतक-यांचे भातशेतीचे पंचनामे

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील १२३ गावातील ७१८.५३ हेक्टर क्षेत्रावर ऐकूण ३,०३५ शेतक-यांच्या नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे आतापर्यंत पूर्ण झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार यांनी दिली. यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले असले तरी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने भाताची लावणी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यात काही ठिकाणी भात पसवली आहेत तर काही ठिकाणी लोबींत दाणे तयार होण्याच्या(गर्भात)आली होती. याच वेळेला पावसाने पाठ फिरवल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. शेतात ओलावा राहीलेला नाही, भात पीक जेव्हा गर्भाच्या अवस्थेत असते, तेव्हा त्याला सर्वात जास्त पाण्याची गरज असते. या काळात शेतात पाणी साठून राहणे आवश्यक असते. परंतु, कडक ऊन आणि पावसाच्या खंडामुळे भाते करपून गेली. कातळावरील भातशेती पुर्णत: वाया गेली आहे. या गंभीर परिस्थिमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनानेही लांजा तालुकाही दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केला असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

टाईम्स स्पेशल

लांजा तालुका दुष्काळी तालुका जाहीर होण्याअगोदर लांजा तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार यांनी आपल्या टीमसह शेतक-यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पहाणी करून पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे. तसेच चिंतेत पडलेल्या शेतकर्‍यांनाही धीर देण्याचे काम करीत आहेत. लांजा तालुक्यात आतापर्यंत ७१८.५३ हेक्टर क्षेत्रातील ३०३५ शेतक-यांचे पंचनामे झाले असुन उर्वरित नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती शेलार यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg