loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा विश्रामगृहानजीक आयशर टेम्पोची रिक्षाला पाठीमागून धडक; रिक्षा चालकासह महिला प्रवासी जखमी

लांजा (संजय साळवी) - मुंबई-गोवा महामार्गावर लांजा विश्रामगृहानजीक भरधाव आयशर टेम्पोची रिक्षाला पाठीमागून धडक बसली. या अपघातात रिक्षा चालकासह महिला प्रवासी जखमी झाली आहे. ही घटना आजज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर रिक्षा क्रमांक एमएच ०८ एक्यू ९४३६ मधून चालक आणि एक महिला प्रवासी प्रवास करीत होते. त्यावेळी आयशर टेम्पो एमएच ०६ सीपी ३७६७ ने रिक्षाला मागून धडक दिली. रिक्षाला आयशर टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे प्रमाण महामार्गावर वाढत असल्याने वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg