loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची फसवणूक केल्याच्या संशयावरून दापोली पोलिस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल

दापोली (वार्ताहर) : बोट हँडलिंग आणि लाईफ सेव्हिंग टेक्निकचे प्रशिक्षण घेतलेले नसतानाही प्रशिक्षण घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देऊन महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची फसवणूक केल्याच्या संशयावरून दापोली पोलिस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सम्राट नरेंद्र लाड (वय ३९, व्यवसाय नोकरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्णे बाजारपेठ, दापोली येथील मयुरेश आंबुर्ले (वय ३४) याच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.२५ वाजण्याच्या सुमारास अनिल नारायण रघुवीर, जगदीश काशिनाथ पावसे आणि रनिकेत वामन रघुवीर हे हर्णे, ता. दापोली येथील रहिवासी आयटस स्पोर्ट्स अँड सेफ्टी प्रा. लि. कंपनीकडून बोट हँडलिंग व लाईफ सेव्हिंग टेक्निकचे प्रशिक्षण घेतलेले नसल्याची माहिती असतानाही, संशयित मयुरेश आंबुर्ले यांनी गरजू लोकांना बोट चालविण्याचा परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांचा गैरफायदा घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

संशयित आंबूर्ले यांनी फिर्यादी लाड यांच्या कंपनीच्या पॉवर बोट हँडलिंग व लाईफ सेव्हिंग टेक्निकचे बनावट प्रमाणपत्र तयार करून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या पर्यायाने महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारी नुसार संशयित मयुरेश आंबूर्ले यांचे विरोधात दापोली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (इछड) कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३) आणि ३३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हेमराज निर्मळ करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg