loader
Breaking News
Breaking News
Foto

कोनाळकट्टा येथे ठेकेदाराने जलवाहिनीवर सिमेंट काँक्रिट टाकले, लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया, कारभाराबाबत नाराजी

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते तिलारी रस्ता काम करताना संबंधित ठेकेदाराने मुख्य रस्त्यावर गटारात किंवा पुलाच्या ठिकाणी गावातील नळपाणी योजना जलवाहिनी कशा आहेत, याची माहिती घेऊन या जलवाहिनी फुटणार नाही याची काळजी घेऊन काम करणे ही जबाबदारी आहे. पण संबंधित ठेकेदार कामगार आपली मनमानी करत आहेत. कोनाळकट्टा येथे पुलाच्या ठिकाणी जलवाहिनी आहे याची माहिती दिली असताना या ठिकाणी सिमेंट काँक्रिट चक्क जलवाहिनी वर टाकल्याने पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटून कारंजे उडू लागले. यात हजारो लिटर पाणी वाया गेले. तर काही वाडयांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठेकेदाराकडून सुरू असलेल्या मनमानीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कोनाळकट्टा येथे जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. मुख्य रस्त्यावर जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठा फवारा उडत असून हजारो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी वाया जात आहे. सकाळपासूनच ही गळती सुरू असून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. अनेक वाहनचालकांना पाण्याचे कारंज्याचा अनुभव घेता आला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिनीला मोठी गळती लागून पाणी जोरात बाहेर पडत आहे. दुसरीकडे अशा प्रकारे पाणी वाया जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. संबंधित ठेकेदार कामगार यांनी ग्रामपंचायत कडून जलवाहिनी बाबत माहिती घेणे आवश्यक होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg