loader
Breaking News
Breaking News
Foto

खारघरमधील दुर्लक्षित तलावातील गाळ उपसा करा! शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील यांची सिडकोकडे मागणी

पनवेल : खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे आणि पनवेल परिसरातील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी खारघरमधील ओवे कॅम्प परिसरातील दुर्लक्षित तलावाची स्वच्छता करून गाळ उपसा करावा आणि स्थानिकांसाठी जलसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परिसरात नवीन गृहप्रकल्प उभे राहत असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. सिडकोकडून पुरविण्यात येणारे टँकरही अपुरे पडत असून, पाणीटंचाईचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सुटेपर्यंत सिडकोने नवीन बांधकामांना प्रारंभ प्रमाणपत्र (CC) आणि भोगवटा प्रमाणपत्र (OC) देण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.

टाईम्स स्पेशल

खारघरमधील ओवे कॅम्प परिसरातील तलावाची योग्य स्वच्छता व गाळ उपसा केल्यास उपलब्ध जलसाठ्याचा उपयोग करून खारघरसह तळोजा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे सिडकोने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे त्यांनी निवेदनात नमूद केले. यावेळी खारघरचे माजी शहरप्रमुख गुरुनाथ पाटील आणि माजी शहर समन्वयक रामचंद्र देवरे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg