loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

डोंबिवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते डोंबिवली शहर विधानसभा व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील २०० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संघटनात्मक कामाला या नियुक्त्यांमुळे नवे बळ मिळणार आहे. डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद सातत्याने वाढत असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे पक्षाची संघटनात्मक रचना अधिक भक्कम होताना दिसत आहे. विविध स्तरांवर नव्या जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाचे विचार, भूमिका आणि जनहिताची कामे अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दाखविलेला विश्वास आणि नेते राजू पाटील यांचे मार्गदर्शन या दोन्हींच्या बळावर नवनियुक्त पदाधिकारी पक्षवाढीसाठी, संघटनात्मक मजबुतीसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिक जोमाने कार्यरत होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. २०० हून अधिक नियुक्त्या म्हणजे केवळ पदवाटप नव्हे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे विचारांवर आणि नेते राजू पाटील मार्गदर्शनाखाली संघटनात्मक विस्ताराच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष हर्षद हरिश्चंद्र पाटील म्हणाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg