loader
Breaking News
Breaking News
Foto

सदानंद बळीराम परकर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे मालगुंड शिक्षण संस्थेचे आवाहन

जाकादेवी (संतोष पवार) : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेजचे उपक्रमशील माजी मुख्याध्यापक, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व आचार्य कुल पुरस्कार विजेते, कै. सदानंद बळीराम परकर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हयातील माध्यमिक शाळांतील शिक्षकांमधून प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन मालगुंड शिक्षण संस्थेने केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदानंद बळीराम परकर हाडाचे शिक्षक होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील असत. ते व्यासंगी व्यक्तिमत्त्व होते. सकारात्मक विचार मांडून ते विद्यार्थी, पालक शिक्षक यांचे मनोबल वाढवत. त्यांच्या आदर्शवत कार्याचे चिरकाल स्मरण रहावे, यासाठी मालगुंड शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु.५०००/-(पाच हजार) शाल व मानपत्र असे आहे.

टाईम्स स्पेशल

यावर्षीही रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतून या पुरस्कारासाठी आपले परिपूर्ण प्रस्ताव ३० नोव्हेंबरपूर्वी सेक्रेटरी, विनायक तु. राऊत (9423291028),मालगुंड शिक्षण संस्था मालगुंड ता. जि. रत्नागिरी यांच्या नावे पाठवावेत, असे आवाहन शिक्षण संस्थेने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg