loader
Breaking News
Breaking News
Foto

भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाभरे ग्रामपंचायतीचा पुढाकार

म्हसळा (वार्ताहर) - भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी पाभरे ग्रामपंचायतीने पुढाकार घेत पाभरे धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी सात ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित केली. पाभरे धरणातून परिसरातील गावांना पाणी कसे उपलब्ध करून देता येईल, याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला पाभरे, कांदळवाडा, निगडी, खारगाव, वरवटणे, रेवळी आणि तोंडसुरे या सात ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पाभरे धरणातील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून संबंधित गावांना पाणीपुरवठा कसा करता येईल, पाणीवाटपाचे नियोजन कसे असावे आणि भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर उपस्थितांनी आपली मते मांडली. गावागावांमध्ये पाण्यावरून वाद निर्माण होण्यापेक्षा समन्वयातून पाणीप्रश्न सोडविण्यावर भर देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, जनार्दन बसवत, मझहर काझी, पांडुरंग बने, सरपंच वेदिका पाकड, अनंत नाक्ती, जयदास भायदे यांच्यासह सातही ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. पाभरे ग्रामपंचायतीने घेतलेल्या या पुढाकारामुळे परिसरातील सात गावांच्या पाणीप्रश्नावर एकत्रितपणे विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पाभरे धरणाच्या पाण्याचे नियोजन भविष्यातील पाणीटंचाईवर महत्त्वपूर्ण उपाय ठरण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg