loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली अडखळ जुईकर मोहल्ला येथे अज्ञाताकडून घरफोडी, रोख रक्कम व दागिने चोरल्याची तक्रार दाखल

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील अडखळ येथील जुईकर मोहल्ला परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार फैरोजा अब्दुल रहीम वाकणकर (वय ५७, व्यवसाय गृहिणी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या घरातील बेडरूममध्ये असलेल्या लाकडी पलंगाच्या कप्प्यात रोख रक्कम व सोन्याचे दागिने ठेवले होते. १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता ऐवज मिळून आला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोरीस गेलेल्या ऐवजात १६ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच विविध वजनाचे सोन्याचे दागिने, अंगठ्या, कानातील दागिने आणि सोन्याच्या वस्तूंचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत १ लाख ६६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या चोरीबाबत वाकणकर यांनी शेजार्‍यांशी चर्चा केल्यानंतर आज दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉनस्टेबल संतोष सडकर करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg