loader
Breaking News
Breaking News
Foto

राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंदर यांची आमदार शेखर निकम यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

चिपळूण (संतोष पिलके) : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे मॅनेजर रोमी भिंदर यांनी चिपळूण येथील आमदार शेखर निकम यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान रोमी भिंदर यांनी चिपळूणमधील क्रिकेट क्षेत्राची वाटचाल, स्थानिक खेळाडूंची गुणवत्ता तसेच क्रिकेटच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. चिपळूणमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित युवा क्रिकेटपटूंशी संवाद साधताना त्यांनी क्रिकेटमधील तांत्रिक बाबी, खेळातील शिस्त, मेहनत, सातत्य आणि योग्य सरावाचे महत्त्व याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. खेळाडूंनी मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, भविष्यात चिपळूणमधील गुणवंत युवा क्रिकेटपटूंना मुंबई येथे विशेष प्रशिक्षण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची तसेच आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

रोमी भिंदर यांच्या या भेटीमुळे चिपळूणमधील युवा क्रिकेटपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक क्रिकेटच्या विकासाला राष्ट्रीय स्तरावरील अनुभवाची जोड मिळण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली आहे. यावेळी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोलकर, सचिव राजू सुतार, प्रशिक्षक उदय काणेकर, सुयोग चव्हाण, रुपेश इंगावले, अमित जाधव, सचिन शिंदे, खालिद पटाईत, ओंकार मोरे, अतुल संसारे, प्रशांत कांबळे, हर्ष गणवे आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg