loader
Breaking News
Breaking News
Foto

वाढदिवसानिमित्त लायन पप्पू शेठ यांचा सामाजिक उपक्रम; सुसेरी स्मशानभूमीत बाकड्यांचे लोकार्पण

खेड : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सभासद लायन प्रसाद उर्फ पप्पू शेठ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या सौजन्याने सुसेरी नं. १ येथील स्मशानभूमीत नागरिकांसाठी आसन व्यवस्था (बाकड्यांचे) लोकार्पण करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्मशानभूमीत येणाऱ्या ग्रामस्थांना बसण्यासाठी सोयीची व्यवस्था उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी लायन पप्पू शेठ आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे आभार मानले. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल पप्पू शेठ यांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी, माजी अध्यक्ष महेंद्रजी शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहनजी विचारे, ला. अनिल मोरे, ला. प्रसाद उर्फ पप्पू शेठ, ला. परेश चिखले ला.डॉ. मरकड तसेच सुसेरी येथील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या उपयोगी कार्यातून साजरा करण्याचा पप्पू शेठ यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg