loader
Breaking News
Breaking News
Foto

वायंगणतडमध्ये नवीन सिमेंट काँक्रिट रस्त्याला भेगा; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!

तिलारी (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील वायंगणतड येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याला अवघ्या तीन महिन्यांच्या आतच भेगा पडल्याचे समोर आले आहे. रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी लांबवर भेग गेली असून काही ठिकाणी काँक्रिटचे तुकडे उखडल्याचेही दिसून येत आहे. नवीन रस्त्याची इतक्या कमी कालावधीत झालेली दुरवस्था पाहता बांधकामाचा दर्जा आणि कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काम करताना आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन झाले होते का? तसेच संबंधित कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित प्रशासन आणि ठेकेदाराने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याची पाहणी करावी, भेगा व खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि कामाच्या दर्जाबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. नव्याने बांधलेल्या रस्त्याची अल्पावधीत झालेली दुरवस्था ही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेची बाब असून, आता संबंधित प्रशासन काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg