रत्नागिटी - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय परेडच्या अनुषंगाने तसेच 'ड्रग फ्री इंडिया' अभियानांतर्गत अमली पदार्थाविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'एकता परेड राष्ट्रीय मोटारसायकल रॅली' चे रत्नागिटी जिल्हा पोलीस दलातर्फे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश देण्यासोबतच रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित वाहनचालना याबाबत जनजागृती करण्यात आली. दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुजरात येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही टॅली आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेल्या या टॅलीचे स्वागत मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. वी. बी. महामुनी यांच्या हस्ते टॅलीमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदारांना पुष्प देऊन करण्यात आले. यावेळी ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात रॅलीचे स्वागत करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या मिशन फिनिक्स उपक्रमांतर्गत या रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थाचे सेवन, बाळगणे, विक्री व तस्करी यांमुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली. विशेषतः तरुण पिढीने अमली पदार्थांपासून दूर राहावे, व्यसनाधीनतेपासून स्वतःचे संरक्षण करावे आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, हा संदेश उपस्थित विद्यार्थी, पालक व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांचे प्रभावी चित्रण केले. व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी नागरिकांना अमली पदार्थमुक्त समाज घडविण्याचे आवाहन केले. तसेच मोटारसायकल रॅलीच्या निमित्ताने रस्ता सुरक्षेचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले व वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे, वेगमयदिचे पालन करणे, मद्यपान किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन न चालविणे, वाहन चालविताना मोवाईल फोनचा वापर टाळणे आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात आले. या स्वागत व जनजागृती कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात रॅलीच्या स्वागतासाठी करण्यात आलेली व्यवस्था, पोलीस दलाकडून देण्यात आलेले सहकार्य आणि सहभागींसाठी करण्यात आलेली निवास व्यवस्था याबाबत रॅलीतील काही सहभागी सदस्य व रायडर्स यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात आगमन झाल्यापासून मिळालेले उत्स्फूर्त स्वागत, आपुलकीची वागणूक आणि व्यवस्थापन याबद्दल त्यांनी रत्नागिटी पोलीस दलाचे कौतुक केले. रत्नागिरी शहरासह संगमेश्वर, चिपळूण आणि खेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही या राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीच्या जिल्ह्यातील प्रवासादरम्यान विविध ठिकाणी स्वागत व जनजागृतीपर उपक्रम राबवून 'ड्रग फ्री रत्नागिरी', व्यसनमुक्त तरुणाई आणि सुरक्षित रस्ता वापराचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.