loader
Breaking News
Breaking News
Foto

अवकाळी पावसाचा शिडकावा; दापोलीत दिलासादायक रविवार

दापोली (प्रतिनिधी) : दापोलीत परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे सध्या शेतकर्‍यांमध्ये आणि नागरिकांमध्ये ’कभी खुशी कभी गम’ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा पाऊस काही बाबतीत दिलासादायक तर काही बाबतीत चिंतेचा विषय ठरला आहे. दापोलीत रविवारी १ नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता परतीचा पावसाचा शिडकावा झाला या परतीच्या पावसाच्या शिडकाव्याची काहींना खुशी झाली कारण परतीच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच, जमिनीतील ओलावा वाढल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि आगामी काळातील पाणीटंचाई कमी होण्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. तर काही ठिकाणी मात्र परतीच्या पावसाच्या शिडकाव्याने अनेकांची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे कारण सध्या अनेक ठिकाणी भात कापणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अशा वेळी अचानक आलेल्या पावसामुळे कापून ठेवलेले भात पीक भिजण्याची आणि कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. तर भात झोडून ठेवलेल्या भाताचा पेंढा पार भिजुन गेल्याने गुरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून त्यांच्यात मात्र चांगलेच चिंतेचे वातावरण आहे.

टाईम्स स्पेशल

दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रात २ नोव्हेंबर २०२६ रोजी चे कमाल तापमान (अं.सें.)- ३५.१, किमान तापमान (अं.सें.)- १९.७ तर २९.६ मी.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच यावर्षी २९६७.२ मि.मी. पर्जन्यमानाची आता पर्यंत नोंद झाली आहे. गतवर्षी हीच पर्जन्यमान नोंद २ नोव्हेंबर २०२५ रोजी १९.४ मि.मी.झाली होती. तर गत वर्षाचे या तारखेपर्यंत एकूण पर्जन्यमान (मि.मी.)- ४६१३.२ झाले होते. गतवर्षीचे एकूण पर्जन्यमान (मी.मी.)- ४६७९.२ झाले होते. गत वर्षीचा एकुण ताळमेळ लक्षात घेता १७१२ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. याचा परिणाम भविष्यात पाणी टंचाईची समस्या जाणवण्यावर होणार आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते मात्र दिवसभरात पावसाची सर काही कोसळली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg