loader
Breaking News
Breaking News
Foto

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत कुवारबाव येथे भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी(वार्ताहर)- ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना तसेच आवश्यक शासकीय प्रमाणपत्रांचा लाभ मिळावा, यासाठी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ कुवारबाव ग्रामपंचायत, उत्कर्षनगर, रत्नागिरी येथे सोमवारी आयोजित करण्यात आले होते. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री नामदार डॉ. उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये जातीचे दाखले, नॉन-क्रीमी लेअर प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, प्रॉपर्टी कार्ड, मतदान ओळखपत्र, सातबारा उतारे आदी कागदपत्रांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदय गायकवाड, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, अपूर्वा कारंडे, बी. टी. मोरे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ तसेच भटक्या जाती व विमुक्त जमाती प्रवर्गातील लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर निवे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी शासनाच्या वतीने भटके-विमुक्त समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देत पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

यावेळी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, सहाय्यक संचालक उदय गायकवाड तसेच बी. टी. मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी समीक्षा बोडेकर हिने जिल्हा परिषदेच्या परीक्षेअंतर्गत नासा, अमेरिका संबंधित उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कार्यक्रमाला लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg