loader
Breaking News
Breaking News
Foto

कामोठ्यात भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबिर संपन्न, ११३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पनवेल : मावळा ब्रिगेड (नवी मुंबई), मैत्र प्रतिष्ठान (घोडपदेव–भायखळा) आणि एम.एस.पी. फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर व मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास घरत, तसेच डॉ. विठ्ठल काळे – युनिट प्रमुख, कान-नाक-घसा तज्ञ व Head & Neck Cancer Specialist, जे. जे. शासकीय रुग्णालय, मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बलराज गणपत साळोखे, नाना मगदूम (अध्यक्ष, व्यापारी संघटना कामोठे), मावळा ब्रिगेडचे मार्गदर्शक गणेश बेरगळ, अ‍ॅड. रवी कदम, सल्लागार पवनकुमार बेरगळ, पांडुरंग यमगर, अ‍ॅड. कपिल शेटे, हेमंत गायकवाड, सुशांत काटकर, कैलाश सरगर, तसेच जे. जे. रुग्णालयाचे MSW कदम, शिंदे आणि रावसाहेब बुधे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सामाजिक उपक्रमाला विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मावळा ब्रिगेडचे शिलेदार, एम.एस.पी. फाउंडेशनचे संस्थापक मायाप्पा बुधे, मैत्र प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विशाल बाबर आणि अनेक हितचिंतकांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल ११३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर असंख्य नागरिकांनी मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. रक्तदानातून जीवनदान आणि आरोग्य तपासणीतून आरोग्य संवर्धन असा दुहेरी सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाची माहिती मावळा ब्रिगेडचे संस्थापक-अध्यक्ष संदिप वावरे यांनी दिली. संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सेक्रेटरी लक्ष्मण कारंडे, खजिनदार महेंद्र हिरे आणि कार्याध्यक्ष दिनेश निलख यांनी दिली. संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती उपाध्यक्ष योगेश निलख, उपसेक्रेटरी राजेंद्र गडदे, उपखजिनदार गणेश शिंदे, सचिन शेंबडे, उपकार्याध्यक्ष संदिप नलावडे आणि रोहित कोळेकर यांनी उपस्थितांना दिली. या वेळी मावळा ब्रिगेडचे ब्रह्मा कारंडे, नितेश वाझे, सचिन गोरड यांच्यासह सर्व शिलेदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मावळा ब्रिगेडचे ज्येष्ठ शिलेदार राजाराम पाटील यांनी प्रभावीपणे केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg