loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स महाविद्यालयाच्या सलोनी कदमला कथालेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक

दापोली (प्रतिनिधी) - मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजची एस. वाय. बी. कॉम. (मॅनेजमेंट स्टडीज) या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी सलोनी अर्जुन कदम हिने मराठी कथालेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या यशामुळे साहित्य स्पर्धा प्रकारात महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत आणखी एका पारितोषिकाची भर पडली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धा प्रकारात महाविद्यालयाला सलोनीच्या रूपाने प्रथमच पारितोषिक मिळाले आहे. सदर स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या एकूण १२ झोन मधून शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सलोनीला या यशासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. कैलास गांधी, मुंबई विद्यापीठाच्या उत्तर रत्नागिरी विभागाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. संतोष मराठे तसेच महाविद्यालयाच्या साहित्य विभागाचे समन्वयक प्रा. तेजस मेहता यांचे मार्गदर्शन लाभले. सलोनीच्या या यशाबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. घनशाम साठे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg