loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी रत्नागिरीचे अद्वैत कुलकर्णी यांची नियुक्ती

रत्नागिरी ( किशोर मोरे ) :भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची नवीन घोषणा नुकतीच करण्यात आली असून, यामध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला विशेष प्राधान्य मिळाले आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री. कृष्णराज महाडिक यांच्या मान्यतेने ही नवीन प्रदेश पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अद्वैत कुलकर्णी या तरुण आणि धडाडीच्या चेहऱ्याला प्रदेश पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, यामुळे रत्नागिरी व कोकण पट्ट्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि प्रभारी सुनील राणे यांनी ही नवी टीम तयार केली असून, या सर्व नियुक्त्यांमुळे आगामी काळात राज्यातील युवा संघटना अधिक मजबूत होईल आणि तळागाळातील युवकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg