loader
Breaking News
Breaking News
Foto

बी.ए.परीक्षेत अर्थशास्त्र विषयात महाराष्ट्रात प्रथक क्रमांक पटकावलेल्या वैष्णवी भोगल हिचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

दापोली ( प्रतिनिधी ) : बी.ए. परीक्षेत अर्थशास्त्र विषयात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल वाघवे भैरीचा कोंड येथील वैष्णवी भोगल हीला महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिले जाणारे लक्ष्मीबाई पाटील पारितोषिक मिळाले. दापोली तालुक्यातील वाघवे भैरीचा कोंड या दुर्गम भागातील गाव खेड्यात राहणारी अतिशय गरीब घराण्यातील वैष्णवी भोगल ही शेतमजुरी करणार्‍या, हातावर कमवून खाणार्‍या एका गरीब शेतक-याची मुलगी आहे. तिने परिस्थितीचा बागुलबुवा न करता कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय बी.ए.ची पदवी प्राप्त केली. वैष्णवीने अर्थशास्त्र या विषयात सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत अगदी खडतर परिस्थितीतही यश मिळवून स्वतःतील नैपुण्य सिद्ध करून दाखवले. अशा या नैपुण्यप्राप्त विद्यार्थीनीच्या पाठीवर कौतुकाच्या शाबासकीची थाप मारण्यासाठी तीच्या वाघवे भैरीचा कोंड येथील निवासस्थानी जाऊन शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांनी वैष्णवी भोगल हिचा तिच्या कुटुंबियांनासोबत स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन कौतुकाची थाप दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg