महाड :(आनंद पवार) महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्रा.प्रदीप मोहिते यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विशद करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्याचा आढावा घेतला. बाबासाहेबांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेतून त्यांनी समाजाला समता, स्वातंत्र्य,बंधुता आणि मानवतेचा मार्ग दाखविला.दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. याच दिवशी सम्राट अशोक विजया दशमीही साजरी केली जाते.आजच्या काळात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या विचारांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माच्या शिकवणीतून प्रेरणा घेत अनेक अनुयायी आजही बौद्ध धम्माचे पालन करतात.मात्र, धम्माच्या मूळ तत्त्वांचे आचरण करताना सामाजिक ऐक्य, वैचारिक प्रगल्भता आणि मानवतावादी दृष्टिकोन जपणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.योगेश प्रमिला प्रभाकर बोराळे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात धम्माचे महत्त्व विशद केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या परिवर्तनाच्या विचारांचे स्मरण करून देताना, आजच्या काळात सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी वैचारिक समन्वयाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात मतभेद निर्माण होऊन त्यातून पुन्हा वर्गीकरणाची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत व्यक्त करत,धम्माच्या माध्यमातून समताधिष्ठित समाजनिर्मितीचा विचार रुजविण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.सोनार, प्रा.सुरेंद्र वानखेडे,प्रा.जॉब सर, प्रा.बावले,प्रा. वतारी,कार्यालय व्यवस्थापक गणेश महाडिक,अकाउंटंट रमेश पाटील,किशोर पवार,नवनाथ जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पराग माने आणि तोरणे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्राचार्य डॉ. बोराळे यांनी खीर वाटप करून केली.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.