loader
Breaking News
Breaking News
Foto

जोपर्यंत सह्याद्रीचा आशीर्वाद आणि अरबी समुद्राच्या लाटांचा खळखळाट आहे तोपर्यंत कोकणात पाण्याचा दुष्काळ पडणार नाही

देवळे (प्रकाश चाळके) - कोकण हे महाराष्ट्रातील स्वर्ग असल्याचे मानले जाते. या कोकणावर निसर्गाचा आशीर्वादच आहे. कोकणातील मातीत आंबा काजूचे सोनं पिकत. सह्याद्रीतल्या कड्यातून मार्लेश्वराचे आशीर्वाद मिळतात तर रत्नागिरीच्या समुद्राजवळ भैरीबुवाचे आशीर्वाद मिळतात, रत्नागिरीच्या किल्ल्यावरून भगवती मातेचे आशीर्वाद असताना कोकणातील जनतेला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही, असे कोकणी माणूस म्हणत असतो. पाणी कमी जास्त होईल पण पाण्याचा दुष्काळ पडणार नाही, असे ठामपणे कोकणी माणूस म्हणतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील वनराई आणि पूर्व दिशेला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पश्चिमेला असणारा अरबी समुद्र त्याच्यातून उसळणार्‍या खळखळणार्‍या लाटा यांच्या आशीर्वादाने कोकणात पाण्यासाठी कधीही दुष्काळ पडणार नाही. समुद्रातील पाण्याच्या लाटांमुळे तयार होणारे ढग वायू देवतेच्या आशीर्वादाने सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर जातात आणि कोकणासाठी वरदान ठरलेला सह्याद्री पर्वत ते ढग अडवतो. कोकणासाठी पाऊस पडतो. असंच कायम बुजुर्ग मंडळी सांगत असतात.

टाईम्स स्पेशल

कोकणातील प्रत्येक गावात गणपती, दसरा, दिपावली, देवदीपावली, आणि होळी म्हणजेच शिमागोत्सव हे सण मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. प्रत्येक गाव रहाटी मध्ये गावाच्या राखण रखवाली दिल्या जातात. आणि गावाचं रक्षण करण्यासाठी आराधना केल्या जातात. या प्रत्येक ग्रामदेवतेचे प्रत्येक गावाला आशीर्वाद असतात. त्यामुळे निसर्गाची अवकृपा झाली तरी त्यातून निभावून नेण्याची ताकद या सर्व देवतांच्यात असते. आणि कोकणी माणसाचा पूर्ण विश्वास आणि भरोसा आपल्या देवतांवरती असतो, म्हणूनच कोकणात कधी पाण्याचा दुष्काळ पडणार नाही. पाणी कमी जास्त होऊ शकते परंतु पूर्णपणे गावागावात पाणी नाही, असा कधीही दुष्काळ पडणार नाही असा ठाम विश्वास कोकणी माणूस व्यक्त करतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg