loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा न्यायालय येथे ९ ऑक्टोबरला मोफत नेत्र तपासणी शिबिर

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयीन बेलिफ कर्मचारी (गट-क) संघटनेच्या पुढाकाराने जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग-ओरोस येथे शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, वकील तसेच पक्षकारांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा न्यायालय संकुलातील बेलिफ कर्मचारी संघटना कार्यालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयाकडून ही तपासणी केली जाणार आहे. सकाळी ९ ते १०.३० या वेळेत न्यायिक अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांची नेत्र तपासणी केली जाईल. त्यानंतर वकील व पक्षकार यांची नेत्र तपासणी करण्यात येईल. यावेळी साठ वर्षावरील गरजू पक्षकारांना प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज ट्रस्ट तर्फे मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

न्यायालयीन कामकाजाच्या ठिकाणीच अधिकारी, कर्मचारी, वकील आणि पक्षकारांसाठी नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बेलिफ संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष दशरथ गावडे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg