loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेड तृतीय

खेड, : रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये आयोजित जिल्हा स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत खेड तालुक्याचे नेतृत्व करणार्‍या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व जुनिअर कॉलेज खेड या विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून दिव्या सुधीर जोगळे हिच्या आई, पृथ्वी, या भूमिकेला गौरविण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण आठ शाळांनी सहभाग घेतला होता. महासागरांचे पुनरुज्जीवन यावर आधारित विज्ञान नाटिका हॅशटॅग आईसाठी, या नाटिकेच्या माध्यमातून, महासागराचे होणारे प्रदूषण, त्याचे सजीव सृष्टीवर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना, या सामाजिक विषयांवर आधारित विज्ञान नाटिका सादर करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नाटिकेतील सहभागी कलाकारांनी संपूर्ण सभागृहातील प्रेक्षकांच्या मनावर आपल्या कलागुणांनी अधिराज्य गाजवत सर्वांची मने जिंकली. या यशस्वी नाटिकेचे लेखन प्रा. अनघा कोलगे/ तोडकरी यांनी केले, तर अनघा कोलगे, हेमा आंबुर्ले व मुग्धा बेलोसे, स्वप्निल वनारे, राकेश देवरुखकर, प्रियांका नाईक, यांनी नाटिकेचे दिग्दर्शन केले. तसेच टेक्नोसेवी म्हणून शिंदे मॅडम, पनदेरे शिपाई, वैदेही निकम यांनी काम पाहिले. या नाटिकेसाठी संस्था, शाळेचे प्र. मुख्याध्यापक धोत्रे, पर्यवेक्षक कांबळे, आणि शाळेतील सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले.

टाईम्स स्पेशल

या नाटिकेमध्ये दिव्या जोगळे, प्रणव बेलोसे, संबोधी जाधव, यशस्वी चव्हाण, आर्या चव्हाण, गार्गी मोरे, सोहम माने, ओम मोरे आदी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे नाटिकेला विशेष दाद मिळाली. तसेच सहकलाकार म्हणून शाल्मली तांबडे, वेदांत माळी, वेदांत पदुमले, सार्थक पवार, जान्हवी दयाळकर यांचे सहकार्य लाभले. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व सर्व संबंधितांचे प्रशाला व संस्थे तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg