loader
Breaking News
Breaking News
Foto

खारघर मध्ये रंगणार भक्ती, परंपरा आणि गरब्याचा भव्य उत्सव, खारघरची आई - नमो गरबा 2026 चे आयोजन

पनवेल :- भारतीय जनता पार्टी प्रणित मधु पाटील प्रतिष्ठान आणि प्रवीण पाटील वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर मध्ये यंदा खारघरची आई - नमो गरबा 2026 या भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, संस्कृती, संगीत आणि गरब्याचाा उत्साह एकाच ठिकाणी अनुभवता यावा यासाठी यंदा विशेष नियोजन करण्यात आले आहे. या नमो गरबा २०२६ ची तिकिटे BookMyShow वर उपलब्ध असून या नमो गरबासाठी संगीत सम्राट आणि मी होणार सुपरस्टार फेम श्रावणी महाजन यांची उपस्थिती लाभणार आहे. खारघर आणि परिसरातील नागरिकांसाठी हा उत्सव आकर्षणाची केंद्र ठरणार असून मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतील अशी अपेक्षा आयोजनाकडून करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खारघरच्या आई नवरात्रोत्सवाचे हे पहिलेच वर्ष असून पहिल्याच वर्षी मोठ्या स्वरूपात नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा सन्मान राखत नागरिकांना कुटुंबासह आनंद घेता यावा यासाठी उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात परिसरात सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण व्हावे तसेच महिला, युवक, कुटुंबे आणि गरबा रसिकांना एकत्र येऊन उत्सव साजरा करता यावा हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg