loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर : पितांबरी कंपनीच्या प्लॉटवर काम करताना कामगाराचा मृत्यू; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

राजापूर (तुषार पाचलकर ) - राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथील संजय गणपत पांचाळ (वय ३५) यांचा कामाच्या ठिकाणी अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. ते पितांबरी कंपनीच्या सुर्वे प्लॉटवर काम करत असताना ही घटना घडली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांचाळ यांना गेल्या दोन वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता. त्यासाठी त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. बुधवारी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास ते पितांबरी कंपनीच्या सुर्वे प्लॉटवर काम करत असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले संदेश संतोष कारेकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, रायपाटण येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

टाईम्स स्पेशल

संजय पांचाळ यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.संजय पांचाळ यांच्या पश्चात आई, पत्नी, इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांची मुलगी पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असून, मुलगा ताम्हाणे येथील मराठी शाळेत शिकत आहे. कुटुंबाची जबाबदारी असलेल्या संजय पांचाळ यांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg