loader
Breaking News
Breaking News
Foto

वाहतूक पोलीस चौकीचं महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : रखरखत्या उन्हात, केवळ कर्तव्यभावनेतून रस्त्याच्या मधोमध उभा राहणारा आपला वाहतूक पोलीस. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता शहराचा गाडा सुरळीत हाकणाऱ्या या वर्दीतील माणसालाही वेदना असतात, त्यालाही दोन क्षण विश्रांतीची गरज असते, हीच माणुसकीची साद ओळखून पनवेल महानगर प्रेस क्लब ने सामाजिक बांधिलकी जपत पनवेलमध्ये एक अत्यंत स्तुत्य आणि भावनिक उपक्रम राबविण्यात आला आहे. वाहतूक नियोजन करताना क्षणभर विसावण्यासाठी सावलीचीही जागा नसलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी 'पनवेल महानगर प्रेस क्लब'ने पुढाकार घेत एक संवेदनशील पाऊल उचलले. या प्रयत्नांना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते प्रकाश बिनेदार आणि म्हात्रे अपघात रुग्णालयाचे डॉ. नितीन म्हात्रे यांची मोलाची साथ लाभली आणि यातूनच पनवेलमध्ये 'वाहतूक पोलीस निवारा कक्षा'ची एक हक्काची सावली उभी राहिली. या निवारा कक्षामुळे उन्हाच्या झळा सोसणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या चेहऱ्यावर एक आगळेच समाधान आणि आनंद पाहायला मिळाला. नुकतेच या बहुप्रतीक्षित निवारा कक्षाचे लोकार्पण पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या शुभहस्ते अत्यंत दिमाखात संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या हृदयस्पर्शी सोहळ्याला नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक पोलीस उप आयुक्त योगेश गावडे, पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, डॉ. नितीन म्हात्रे, गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक गणेश कडू, अजय बहिरा आणि नगरसेविका अस्मिता घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या आनंदाच्या क्षणी पनवेल वाहतूक शाखेचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक तुकाराम कदम, सहायक पोलीस निरीक्षक भागवत, सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान तायडे, पोलीस हवालदार महेंद्र राजपूत, अमीर मुलाणी, सतिष चौधरी, सागर ढेंबरे, पोलीस नाईक केशव निकम, विश्वनाथ पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश जंजाळ, महेंद्र गळवे, घरजळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता पाटील आणि संजय घाडगे या सर्व कर्मचाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

खाकी वर्दीतल्या माणसाला दिलेला हा विसावा आणि हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, अनिल भोळे, सहसचिव स्वप्नील दुधारे, खजिनदार सचिन भोळे आणि लालचंद यादव यांनी घेतलेले अथक परिश्रम खऱ्या अर्थाने सार्थ ठरले आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने पोलिसांप्रती अशीच संवेदनशीलता दाखवली, तर त्यांच्याही पाठीवर कौतुकाची आणि विश्रांतीची एक हक्काची थाप नक्कीच पडेल, हेच या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg