loader
Breaking News
Breaking News
Foto

स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांना लुटू नका : खेडमधील युवा रोजगार संघाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सक्तीने बसविल्या जात असलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या बिलात प्रचंड वाढ होत असून, या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देऊन स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ - महाराष्ट्र राज्य या संघटनेने मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर, तालुकाध्यक्ष मिलिंद जाधव, शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे आणि युवा तालुकाध्यक्ष सचिन खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी हे १५ कलमी निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, MERC अध्यक्ष, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि MSEDCL च्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठविण्यात आले आहे. स्मार्ट मीटरमुळे अचूक रीडिंगचा उद्देश सांगितला जात असला, तरी प्रत्यक्षात मीटर बदलल्यानंतर अनेक ग्राहकांची बिले दुप्पट-तिप्पट आल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. Electricity Act 2003 आणि MERC च्या ग्राहक संरक्षण नियमांनुसार ग्राहकाला अचूक मीटरिंग आणि तक्रार निवारणाचा अधिकार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संघटनेच्या प्रमुख १५ मागण्या : १) स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करून सर्वंकष आढावा घ्यावा. २) बिल अचानक वाढलेल्या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करावी. ३) ग्राहकाच्या उपस्थितीत अधिकृत लॅबमध्ये मीटर टेस्टिंगची सुविधा द्यावी. ४) जुन्या व नव्या मीटरचे रीडिंग ग्राहकाच्या उपस्थितीत नोंदवून प्रत द्यावी. ५) मीटर बदलण्यापूर्वी पुरेशी पूर्वसूचना आणि कारण देणे बंधनकारक करावे. ६) बिल वाढल्यास मीटर तपासणीचा अधिकार ग्राहकाला द्यावा. ७) दोष आढळल्यास MERC नियमांनुसार पारदर्शक बिल आकारणी करावी. ८) बिलामध्ये मागील वापर, चालू वापर आणि दराची स्पष्ट माहिती द्यावी. ९) ग्राहकांच्या वीज वापराच्या डेटाची गोपनीयता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी. १०) MSEDCL मार्फत सामाजिक व तांत्रिक ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करावा. ११) जिल्हानिहाय बिलवाढीचा अभ्यास करावा. १२) अवाजवी बिल लादले जाणार नाही यासाठी संरक्षण यंत्रणा निर्माण करावी. १३) तक्रार निकाली निघेपर्यंत चुकीच्या बिलामुळे कारवाई करू नये, असे आदेश द्यावेत. १४) ग्राहक प्रतिनिधींची सार्वजनिक सुनावणी घ्यावी. १५) स्मार्ट मीटरमुळे फायदा की आर्थिक भार, याचा स्वतंत्र अहवाल जनतेसमोर ठेवावा.

टाईम्स स्पेशल

"आमचा स्मार्ट तंत्रज्ञानाला तत्त्वतः विरोध नाही, परंतु तंत्रज्ञानाच्या नावाखाली सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडता कामा नये. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास, पारदर्शकता आणि कायदेशीर संरक्षण सर्वात महत्त्वाचे आहे," अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg