loader
Breaking News
Breaking News
Foto

नवविवाहितेची आत्महत्या.. आरोपींना मुंबई उच्च न्यायालय सर्किट ब्रँच कडून जामीन मंजूर, अ‍ॅड. श्रेयस बुटाला यांच्या प्रभावी युक्तिवाद

मुंबई : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या दिनेश कदम व अन्य एका आरोपीविरुद्ध जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी अपीलमध्ये बॉम्बे हायकोर्टाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ व ४९८अ सह कलम ३४ अंतर्गत दोषी ठरविण्यात आले होते. जिल्हा न्यायालयाच्या शिक्षेच्या आदेशाविरुद्ध आरोपींच्या वतीने अ‍ॅड. श्रेयस सुधीर बुटाला यांनी बॉम्बे हायकोर्टात फौजदारी अपील दाखल करून शिक्षेला स्थगिती देऊन जामीन मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. बुटाला यांनी न्यायालयासमोर उपलब्ध पुराव्यांचे सविस्तर विश्लेषण मांडले. अभियोजन पक्षाच्या पुराव्यातील विसंगती, साक्षी-पुराव्यातील त्रुटी तसेच आरोपी आणि मयत महिलेच्या परस्पर संबंधांबाबतचा बचाव पक्षाचा पुरावा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोपींकडून मयत महिलेला चांगली वागणूक दिली जात होती, तिची काळजी घेतली जात होती आणि आरोपींकडून तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले नसल्याचे दर्शविणारा बचाव पक्षाचा पुरावाही न्यायालयासमोर मांडण्यात आला. तसेच या सर्व बाबींच्या अनुषंगाने विविध न्यायालयांचे संबंधित निवाडे अ‍ॅड. बुटाला यांनी सादर केले. दरम्यान, सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाकडून असा युक्तिवाद करण्यात आला की, सदर प्रकरणात मयत महिलेच्या कुटुंबीयांना/फिर्यादी पक्षाला अपीलच्या कार्यवाहीत पक्षकार करण्यात आलेले नसल्याने जामीन अर्ज मंजूर करू नये. या आक्षेपाला उत्तर देताना अ‍ॅड. बुटाला यांनी मयत महिलेच्या नातेवाईकांना सदर फौजदारी अपील अथवा शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जात स्वतंत्रपणे पक्षकार करणे आवश्यक नसल्याबाबतचा संबंधित न्यायालयीन निवाडा बॉम्बे हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिला.

टाईम्स स्पेशल

अ‍ॅड. बुटाला यांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे, उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण, पुराव्यातील विसंगती, बचाव पक्षाचा पुरावा तसेच सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन निवाड्यांचा विचार करून माननीय बॉम्बे हायकोर्टाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे, सदर सुनावणीदरम्यान पक्षकार करण्याच्या मुद्द्यावर अ‍ॅड. श्रेयस सुधीर बुटाला यांनी सादर केलेल्या कायदेशीर भूमिकेची न्यायालयाने दखल घेतली असून, त्यांची आळर्लीी र्उीअ‍ॅळरश (न्यायालयास सहाय्य करणारे मित्र) म्हणून नियुक्ती करण्याबाबतही न्यायालयाने विचारणा केली आहे. या प्रकरणातील निकालामुळे दोषसिद्धीनंतर अपील प्रलंबित असताना शिक्षेला स्थगिती व जामीन देण्याच्या प्रक्रियेत तसेच मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना अपील कार्यवाहीत पक्षकार करण्याच्या कायदेशीर मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg