loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड हापूसच्या पेटीला वाशी मार्केटमध्ये ३६ हजारांचा भाव!

देवगड (प्रतिनिधी) - देवगड हापूस आंब्याने हंगामापूर्वीच वाशी मार्केटमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. देवगडमधील प्रगतशील बागायतदार मिलेश बांदकर यांनी पाठवलेल्या हापूस आंब्याच्या पेटीला आज वाशी मार्केटमध्ये तब्बल ३६ हजार रुपयांचा भाव मिळाला. हंगामापूर्वीच मिळालेल्या या दरामुळे आंबा उत्पादकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात आलेल्या मोहरातील आंबे योग्य निगा आणि विशेष काळजी घेत ऑक्टोबर महिन्यापर्यंत टिकवून ठेवत बांदकर यांनी हा प्रयोग यशस्वी केला. हंगाम सुरू होण्यापूर्वीच देवगड हापूसला मिळालेल्या या दरामुळे त्यांच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg