पनवेल : कामोठे येथील खांदेश्वर रेल्वेस्थानकाजवळ आयोजित नवरात्रोत्सवाला पारनेर नगरचे आमदार काशिनाथ दाते यांनी भेट देत खांदेश्वरच्या माऊलीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दांडिया उत्सवातही सहभाग घेतला. नवरात्रोत्सवासाठी एकत्र आलेल्या भाविकांचा उत्साह पाहून त्यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि दांडिया खेळणाऱ्या तरुण-तरुणींना प्रोत्साहन दिले.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जय हनुमान सामाजिक, सांस्कृतिक विकास मंडळ, मोठा खांदा आणि पारनेर रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे सेक्टर २५ येथे यंदा प्रथमच नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच या उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, माऊलीच्या दर्शनासाठी तसेच दांडियामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पारनेर रहिवासी संघाचे अध्यक्ष भाऊ पावडे यांच्या संकल्पनेतून कामोठे येथे साजरा होणारा दहीहंडी उत्सव पनवेलसह राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. याच सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला पुढे नेत यंदा नवरात्रोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली. भाजप ओबीसी मोर्चाचे पनवेल शहराध्यक्ष सतीश पाटील आणि भाऊ पावडे यांनी दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमोर हा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिल्यानंतर नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
आमदार काशिनाथ दाते यांच्या भेटीमुळे उत्सवातील उत्साहात आणखी भर पडली. त्यांनी माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर दांडिया कार्यक्रमालाही उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगरमधील नेते प्रशांत गायकवाड, कामोठे येथील पारनेरकरांचे मार्गदर्शक कुंडलिक वाफारे, कामगार नेते मोतीराम कोळी, दिलीप घुले, कृष्णा ढोमे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्य आयोजक सतीश पाटील यांनी आमदार दाते यांचे स्वागत केले. धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक उत्साह यांचा संगम घडविणाऱ्या या नवरात्रोत्सवाला पहिल्याच वर्षी मिळालेला प्रतिसाद आयोजकांचा उत्साह वाढविणारा ठरत आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.