loader
Breaking News
Breaking News
Foto

पूर्णगड गावात आणखी एक मानाचा तुरा, तृप्ती शिरगांवकर यांचा गौरवांकित सन्मान

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थाच्या सर्वागिण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या विशेष शिक्षकाचा सन्मान सोहळा अस्मिता केंद्रे अध्यक्ष जि. प. रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वैदेही रानडे (भाप्रसे)मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. रत्नागिरी, मा विलास चाळके उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती जि.प. रत्नागिरी, महेश नाटेकर सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती, मा सुयोग कांबळे सभापती समाज कल्याण समिती, मयुरी शिर्के सभापती महिला व बालकल्याण समिती तसेच किरण लोहार शिक्षणाधिकारी (योजना) दीपक मेंगाने शिक्षणाधिकारी माध्यमिक, मनिषा जगदाळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये‌ व नंदकुमार मुरकर क्रीडा, शिक्षण व वित्त सभापती यांच्या प्रमुख उपस्थितत हा विशेष शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी पूर्णगड गावच्या रहिवाशी आणि सामाजिक बांधिलकी जपणार्या व समाज प्रबोधनात्मक काम करणार्या तृप्ती तुषार शिरगांवकर या विशेष शिक्षक पदावर काम करत आहेत. त्यांनी पंचक्रोशीत दिव्यांगाच्या गरजा, शैक्षणिक मानसिक, सामाजिक विषयी जागरण करून समजावून विकास कौशल्य या विषयी मार्गदर्शन करून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले. या विशेष शिक्षकांना सन्मान पत्राद्वारे गौरवण्यात आले. त्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg